भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी

mrugajal dise sachapana aisen | khotiyachen pisen ur phodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥ संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥ तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी आगीं सवें ॥३॥