भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो

molachen ayushya vechatase seve | nugavatan gove khed hoto

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिषांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥ तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥