भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां

mol deuniyan santhavave dosh | natache te vesh pahoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥ हरीतील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥ तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभक्तीहीन रसीं गोडी ॥३॥