भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं

mokshapaden tuchchha kelin yakaranen | amhan janma ghenen yugayugin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥ तुका म्हणे चित्त निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें विटेवरी ॥३॥