भजनी मालिका
← भजनों पर वापस

मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो

mi vasudev name phodito nitya taho

रचनाकार: अज्ञात · अभंग #वासुदेव
मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो । देखिले पाय आतां मागतो दान द्या हो। सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो। पावन संतवृंदे सादरे दृष्टि पाहो ।।१।। रामकृष्ण वासुदेवा । हरि रामकृष्ण वासुदेवा ।।धृ.।। सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो। मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागो । भाविक प्रेमळांच्या संगती चित्त लागो ।।२।। अद्वैतेचि चालो अक्षयी भक्तियोग। स्वप्नीही मानसाते नातळो द्वैतसंग । अद्वयानंद वेधे नावडो अन्य भोग। अक्रियत्वचि वाहो सत्क्रिया रूप बोध ।। ३ ।। पाहता विश्व माते निजरूप दाखवी। सत्कथा श्रवण की पीयूष चाखवी। रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणे बा रे घेई ।।४।। हे दान पावले सद्‌गुरू शांतिलिंगा। हे दान पावले आत्मया पाडुरगा । हे दान पावले व्यापक अंतरंगा । हे दान पावले एका जनार्दनी। दोष जाती भंगा ।।५।।