भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा

mi mi mhanatan vayan gelen sarva | pahe tun apurva naval bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥ रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥ मीपणे दुर्योधन बहुत गर्वीत । नासलें जीवित रणांगणीं ॥३॥ ऐसें तें बहुत मीपणें नासलें । एका जनार्दनीं भलें मीपण रहित ॥४॥