भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों

mi mi mhanatan avaghen mi jalon | tumpanacha bola lajuniyan thelon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥ माझें मीपण मजमाजीं निमालें । एकोनेक सकळ सहजीं सहज जालें ॥३॥ एकाजनार्दनीं गणीत नवानी येकु । परापरते सारुनी उगला सिध्दांतु ॥४॥