भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे

mhane viththal bramha navhe | tyache bol naikave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥ तुका म्हणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥३॥