भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितों दास । परि मी असें उदास

mhanaviton das | pari mi asen udas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥ हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून असे भिन्न ॥२॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥३॥