भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं

mhanaviton das na karitan seva | landapanen deva pot bharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥ आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥ तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥