भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी

mhanauni sharan javen | sarvabhaven devasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥ तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥