भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार

mhanauni kay jiun bhaktapan | jayachin bhushanen alankar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥ तुके तरि तुकीं खऱ्याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरी ॥२॥ तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥