भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार

mhanauni kakulati | yeton pudhat pudhati | tumachiya ase hatin | kamalapati bhandar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥ कोठें न घाली धांव । याजसाठीं त्यजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥ कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥