भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें

mhanauni jhali tuti | nahin bheti ahankaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥ हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥ तुका म्हणे एकांतसुखें । अवघी गोतें गुंतलें ॥३॥