भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि

mhanauni jalon kshetrinche sannyasi | chitta ashapashin avaruni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पीला ॥३॥