भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत

mhanata datta datta | datta kari gunatit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥ दत्तनामाचा निजंछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥ निज भाव समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥३॥ एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥