भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात

mhanasi nahin re sanchit | na karin na karin aisi mat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥ लाहो घेई हरीनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरी म्हणसी ॥२॥ पुरलासाठी देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥ तुका म्हणे सांगों किती । सेखी तोंडीं पडेल माती ॥५॥