भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणा तुम्हीं विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी

mhana tumhin vishnudas | tenen pure tumachi as | kala pade tras | namasmaranen karuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
म्हणा तुम्हीं विष्णुदास । तेणें पुरे तुमची आस । काळा पडे त्रास । नामस्मरणें करूनी ॥१॥ उघडा मंत्र विठ्ठल हरी । सदा वाचे जो उच्चारी । होतसे बोहरी । पातकांसी तात्काळ ॥२॥ न लगे कांहीं साधन । वाचे म्हणा रामकृष्ण । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनेंसी ॥३॥