भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी

mayevari satta avadichi bala | sankochoni lala pratipali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥ आरुषा वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥ तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठुरता उपेजना ॥३॥