भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे

mayabapapudhen lenkarachi ali | anik he pali kon lale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥ आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥ तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥