भजनी मालिका
← भजनांकडे परत

माय वनीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहें

may vanin dhalya dhay | garbha anvatanen na pahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माय वनीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहें ॥१॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥ पुत्राच्या विजयें । पिता सुखावत जाये ॥२॥ तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे तृषा आणि व्याधि ॥३॥