भजनी मालिका
← भजनांकडे परत

मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या

maun kan dharile vishvachya | jivana uttar vachana dei majhya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं माझे सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूंचि नित्यनेम नारायणा ॥२॥ कृपावचनाची वाट पाहातसे । करुणा वोरसे बोला कांही ॥३॥ तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोला सर्वात्तमा मजसवे ॥४॥