भजनी मालिका
← भजनांकडे परत

मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे

mau menahuni amhi vishnudas | kathin vajras bhedun aise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥ तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥