भजनी मालिका
← भजनांकडे परत

मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं

matsar dnyaniyaten na sodi | ma itar kayasin bapudin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥ शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधें ॥२॥ निर्मत्सर भजनीं गोष्टीं । ऐसा कोण्ही नाहीं सृष्टीं ॥३॥ एका जनार्दनीं मत्सर । तेणें परमार्थ पळे दूर ॥४॥