भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेसी म्हणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । मातें देईं भोजना

matesi mhane bal | dudh pitin mulen sakal | majahi dudh tatkal | maten dein bhojana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातेसी म्हणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । मातें देईं भोजना ॥१॥ मग ते करड्या वांटूनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध म्हणोनी । वाटीयें भात कालविला ॥२॥ तंव शेजारीं ब्राम्हणें श्राध्द केलें । तयाचिया घरां जेवावया नेलें । बरवें उत्तम पक्वान्न वाढिलें । नानापरी भोजना ॥३॥ बाळासी वाढिली दूध क्षीरी । तें जेविलें पोटभरी । एका जनार्दनीं निर्धारी । गेलें आपुल्या गृहासी ॥४॥