भजनी मालिका
← भजनांकडे परत

मात कळों सरे पत्नीपुत्रा वेगें । पातलीसे दोघें रायापाशीं

mat kalon sare patniputra vegen | patalise doghen rayapashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मात कळों सरे पत्नीपुत्रा वेगें । पातलीसे दोघें रायापाशीं ॥१॥ गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानीं बोले तिला माग काई ॥२॥ येरी म्हणे शीर तुझिया पुत्राचें । आपुलिये वाचे रायें दिलें ॥३॥ एका जनार्दनीं मोहिनीचा शब्द । ऎकोनी धर्मांगद काय बोले ॥४॥