भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते

marile asur vadhalya medini | hote konakoni pidit te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मारिले असुर वाढल्या मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥ तया नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥ वरीले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥ नारायण नाम नावडे जयासि । ते झाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥ कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥