भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा

marga te bahutan ahet | sopa panth pandharicha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥ सुखाचिया भरल्या राशी । पाहीजे त्यासी त्यांने घ्यावें ॥३॥ न सरेचि ब्रह्मादिकीं । भरलें देखा भरतें ॥४॥ एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥