भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग

maragin chalatan paulapaulin | chintavi mauli pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥ तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥