भजनी मालिका
← भजनांकडे परत

माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें

map mhane mi maviten | bhari dhani thevi riten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥१॥ देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥ देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥२॥ हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥