भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार

mani bhaktanche upakar | dhari gaulyagharin avatar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मानी भक्तांचे उपकार । धरी गौळ्याघरीं अवतार ॥१॥ प्रेमें नाना छंदें नाचे । उणें पडो नेदी साचे ॥२॥ अंगें धांव घाली । ऐशी कृपेची माउली ॥३॥ एका जनार्दनीं साचा । देव अंकित भक्तांचा ॥४॥