भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेथें परवडी कोण मानवाची

manen brahmadikan kelise thokadi | tethen paravadi kon manavachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनें ब्रह्मादिकां केलीसे थोकडी । तेथें परवडी कोण मानवाची ॥१॥ इंद्रिय न चाले मनाविण देखा । मनाची मनरेखा नुल्लंघवे ॥२॥ शस्त्रें तें न सुटे जळ तें न बुडे । ऐसे ते पोवाडे मनें होतीं ॥३॥ एक जनार्दनीं मन तें स्वाधीन । करितां सर्व यज्ञ हातीं जोडे ॥४॥