भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड

manavaya jag vhavi dravyamaya | nahin te majhiya jiva chad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उशीर आतां देवा ॥२॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥ तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥४॥