भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं

manasi sthirata namen datta vedh | duja nahin chhand anik kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥ म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावाचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥ पाहतां पाहणें परतलें मन । पाहण्याचें विंदान विसरलें ॥३॥ एका जनार्दनीं परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥