भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनासी खेचिलें मायेसी मोकलिलें । तें शस्त्र आपुलें सज्ज करी

manasi khechilen mayesi mokalilen | ten shastra apulen sajja kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनासी खेचिलें मायेसी मोकलिलें । तें शस्त्र आपुलें सज्ज करी ॥१॥ यापरी सैरा होय कारणी । माया ममता दोन्हीं मारूनियां ॥२॥ जागृति स्वप्न निवटिलें पाहे । सुषुप्ति सळीयेली । सुखा धायें ॥३॥ एका जनार्दनीं मांडियेलें खळें । पुरेंचि जिंकलीं अंगीचेनी बळें ॥४॥