भजनी मालिका
← भजनांकडे परत

मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती

manaman kiti | tujhya kshullaka sampatti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील तीं गोडी ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी देसी। आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥ तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥