भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनामधीं तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य

manamadhin tarka kari bhimakabali | trailokyachi sakali deil rajya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनामधीं तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥ म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥ आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनीं ॥३॥ एका जनार्दनीं हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥