भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप

manacheni manen jahalon sharanagat | krupavant sant mayabap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥ धरुनियां आस घातली लोळणीं । मस्तक चरणीं माझा तुमच्या ॥२॥ तुमचा मी दास कामारी त्रिवाचा । आणिक मनाचा संकल्प नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं तुम्हीं तों पावन । काय हा मी दीन वानुं महिमा ॥४॥