भजनी मालिका
← भजनांकडे परत

ममता ठेवूनि घरीदारीं । वायां कां जाशी बाहेरीं

mamata thevuni gharidarin | vayan kan jashi baherin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ममता ठेवूनि घरीदारीं । वायां कां जाशी बाहेरीं ॥१॥ आधीं ममत्व सांदावें । पाठीं अभिमानी सहजी घडे ॥२॥ ममता सांडी वांडेकोडें । मोक्षसुख सहजी घडे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । ममता टाकी निर्दाळून ॥४॥