भजनी मालिका
← भजनांकडे परत

मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाचि वेध तैशापरी

makshikenen jaisa rachiyela kand | vaugachi vedh taishapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाचि वेध तैशापरी ॥१॥ आणिकें झाडितां गुंतोनि पडती । तैशी ही फजिती संसाराची ॥२॥ एका जनार्दनीं कृपा न करी देव । तोंवरी अभाव सर्व जाणा ॥३॥