भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू

majhya vithobacha kaisa premabhav | apan chi dev hoy guru

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥ पढियें देहभावें पुरवि वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥ योगक्षेम जाणे त्याचे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥