भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा

majhya vadilanchi mirasi ga deva | tujhi charanaseva panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥१॥ उपवास पारणी राखिला दारवंटा केला । भोगवाटा आम्हालागी॥ध्रु.॥ वंशपरंपरा दास मी अंकिता । तुका मोकलितां लाज कोणां ॥२॥