भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली

majhya indriyansin lagalen bhandan | mhanatil kan rasana dhali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर ॥ध्रु.॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥ दरुषणें फिटे नेत्रांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेईल तें ॥३॥ तुका म्हणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥