भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो

majhiye manincha janoniyan bhav | to kari upav gururavo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥१॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥२॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे ॥३॥ तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥