भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया

majhiye jatichen maj bheto koni | avadichi dhani phedavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥ आवडे ज्या हरी अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥ सुफळ हा जन्म होईल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥ तुका म्हणे तोचि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरी ॥४॥