भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे तें

majhiye buddhicha khuntala upay | karisil kay pahane ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे तें ॥१॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥ वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरी नयों ॥२॥ तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरूनि ॥३॥