भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या

majhiya sanchita | drudh dekhoni balivanta | palasi pandharinatha | bhene atan tayachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥ भोगाधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥ तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तीसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥