भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव

majhiya manincha phitalase biho | pahuniyan devo dattarav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनियां देवो दत्तराव ॥१॥ फिटला संकल्प तुटली वासना । आन नाहीं कल्पना दुजी कांहीं ॥२॥ एका जनार्दनीं दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥