भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा

majhiya jivasi he chi pain vishranti | tujhe pay chittin panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥१॥ भांडवल गांठी झालेंसे पुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥ उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा॥२॥ तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं ह्मुण ॥३॥