भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली

majhi viththal mauli | premen panha panhaili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥२॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥